रायगड - महानगरपालिका निवडणुकांनंतर आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली. रायगड जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. माणगावमध्ये शिवसेनेकडून एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आलं, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पाडत रमेश मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे माणगाव तालुक्यात शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचं चित्र आहे.माणगावमधील निजामपूर जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार अविनाश नलावडे, तर पंचायत समितीसाठी अक्षय जाधव आणि विलास शिंदे यांनी शेकडो वाहनांच्या ताफ्यासह, हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या भव्य शक्तिप्रदर्शनाला मंत्री भरत गोगावले स्वतः उपस्थित होते. त्यामुळे माणगाव तहसील कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.
Be the first to comment