बीड : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्या दिवशी लिहून ठेवला त्यादिवशी मराठी अभिजात भाषा झाली. आठशे वर्षापूर्वीच आमची मराठी भाषा अभिजात आहे, असं मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केलं. बीडच्या शिरूर कासार शहरात जिल्हास्तरीय सातव्या 'सिंदफणा मराठी साहित्य संमेलन'च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष अमर हबीब यांच्यासह मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती होती. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाची सुरुवात आज ग्रंथ दिंडीनं झाली. यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी, साहित्य प्रेमी उपस्थित होते. एकलव्य विद्यालय शिरूर कासार या महाविद्यालयाच्या प्रांगणात हे साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनात मुलाखत, व्याख्याने, परिसंवाद, कवी संमेलन आदी कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
Be the first to comment