Skip to playerSkip to main content
  • 3 months ago
मुंबईत आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एक खास क्षण अनुभवायला मिळाला. महाराष्ट्र राज्य गीत लावताना तांत्रिक अडचण आली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवत आपल्या मोबाईलमधून महाराष्ट्र गीत माईकसमोर लावलं आणि समयसूचकतेचं उत्तम उदाहरण घालून दिलं. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये गुरुवारी सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बांबू लागवडीचं महत्त्व अधोरेखित केलं. हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी बांबू लागवड शाश्वत उपाय आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन लवकरच बांबू उद्योग धोरण जाहीर करेल. ऊर्जा प्रकल्प असलेल्या जिल्ह्यांत आणि शासकीय पडीक जमिनींवर बांबू लागवडीवर भर दिला जाणार आहे. गडचिरोलीत पाच हजार वृक्षांसह बांबू लागवड होणार आहे. मनरेगा आणि महानिर्मिती कंपनीद्वारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. राज्य शासन बांबूसाठी सशक्त बाजारपेठ आणि किंमत निश्चिती करेल. ऊर्जा विभागामार्फत धोरण आखून बांबू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Category

🗞
News
Transcript
00:00So, let's get into the process of the rules.
Be the first to comment
Add your comment

Recommended