शिर्डी : दक्षिणेतील प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता रघुबाबू यांनी आज सहपरिवार शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं आहे. यावेळी रघुबाबू यांनी सहपरिवार साईबाबांच्या दुपारच्या माध्यन्ह आरतीलाही हजेरी लावली होती. यावेळी साईबाबा संस्थानचे उपकार्यकरी अधिकारी भीमराज दराडे यांनी अभिनेता रघुबाबू यांचा शॉल साई मूर्ती देऊन सत्कार केलाय. दरम्यान यावेळी या साऊथ स्टारनं साईबाबाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. रघुबाबू यांना साईबाबांवर खूप श्रद्धा आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की, ते अनेकदा शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आले आहेत. दरम्यान रघुबाबूबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी साऊथ चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. यापूर्वी देखील अनेक स्टार साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत गेले आहेत.
Be the first to comment