पुणे : जिल्ह्यातील यवत इथं सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं दोन समाजात हाणामारी तसंच दंगल झाल्याचा प्रकार घडला. सध्या यवत इथली परिस्थिती नियंत्रणात आहे. "ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. ज्या माणसानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना केली. त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी. तसंच त्याच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे. त्याच्यावर देशद्रोह गुन्ह्याची नोंद झाली पाहिजे. परंतु अशा घटना होत असताना कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचं ज्यांचं काम आहे. त्या पक्षातील आमदार एका समाजाला लक्ष्य करत आहेत. आता यांनाच राज्यात दंगल घडवायची आहे का?" असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेबुब शेख यांनी सरकारवर जोरदार टीका केली. योग्य कारवाई करण्याची गरज असताना या गोष्टीचे राजकारण होत असल्याचं ते म्हणाले.
Be the first to comment