Skip to playerSkip to main content
  • 3 weeks ago
पुणे : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, अंधार दूर करणारी मिणमिणती पणती अन् आकाशाशी नातं जोडत प्रकाशमान करणारा आकाशकंदील अशा प्रकाशाच्या पारंपरिक आणि आधुनिक साधनांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित केला जातो. दिवाळी पाडावानिमित्त पुण्यातील सारसबाग इथं बुधवारी पहाटे दिवाळी पाडावा पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु कार्यक्रमादरम्यान वाद झाला. यानंतर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दिवाळी पाडव्याला शहरातील मंदिरांसह विविध ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातो. सारसबागेतील मंदिरामध्ये हजारो पणत्या प्रज्वलित करून सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्याची पुणेकरांची प्रथा आहे. भल्या पहाटे दीपोत्सवासाठी आणि दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. धमक्यांना कंटाळून कार्यक्रम रद्द करण्याचा आयोजकांनी विचार केला होता. परंतु पोलिसांकडून सतर्कता बाळगण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात मोठ्या उत्साहात दिवाळी पाडवा कार्यक्रम पार पडला. 

Category

🗞
News
Transcript
00:00Let's get started.
Be the first to comment
Add your comment

Recommended