संगमनेर (अहिल्यानगर) : संगमनेर येथील घुलेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी संग्रामबापू महाराज भंडारे यांच्या कीर्तन कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून कीर्तन बंद पाडलं आणि महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेच्या निषेधार्थ संगमनेर शहरातील सकल हिंदू समाजाने आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भाषणावेळी, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले, "तुमचा वारसा नेमका कोणाचा आहे. हे आम्हाला शोधावं लागलं. तुम्हाला औरंगजेबाचा फुळका का आलाय?, यासाठी तुमचा डीएनए तपासावा लागेल", अशी बोचरी टीका अमोल खताळ यांनी केली.
Be the first to comment