बीड : जिल्ह्यात काही दिवसापासून मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळतोय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारनं अध्यादेश लागू केला. तेव्हापासून लक्ष्मण हाके आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. "लक्ष्मण हाके वाल्मिक कराडची सुपारी घेऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत आहे. परंतु, वाल्मिक कराडचा आका बाहेर आहे. तो आका लक्ष्मण हाकेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन त्याला रसद पुरवून अजित पवारांना तर ब्लॅकमेल करत नाही ना? असा माझा सवाल आहे. गणपतराव देशमुख यांच्या नातूच्या विरोधात लक्ष्मण हाके तुम्ही सुपारी घेऊन उभा राहिला होता. त्याचे पुरावे माझ्याकडं आहेत. धनगर समाजाचे महाराष्ट्रात आठ आमदार आहेत त्यापैकी एकाही आमदाराचा तुम्हाला प्रचार करता आला नाही. त्यांनी थेट लक्ष्मण हाकेंवर टीका केली आहे, असं म्हणत मराठा समन्वयक महेश डोंगरे यांनी लक्ष्मण हाकेंवर टीका केली.
Be the first to comment