Skip to playerSkip to main content
  • 7 months ago
सोलापूर : युवक राष्ट्रवादीच्या वतीनं शहरातील भैय्या चौकात रविवारी दुपारी लक्ष्मण हाके यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याविरोधात जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आलं. "लक्ष्मण हाके हे नेहमी सुपारी घेऊन काम करतात. सध्या अजित पवारांची सुपारी घेऊन ते बोलत आहेत. वैचारिक लढाई लढायला शिका. सुपाऱ्या घेऊन काहीही बोलू नका" असं आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुहास कदम यांनी केलं. नांदेड इथं माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर टीका केली होती. "उपमुख्यमंत्री अजित पवार अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदावर आहेत. त्यांना प्रत्येक वेळी अर्थखातं का हवं असतं? खेड्यापाड्यांमधील भटक्या विमुक्त जातींच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष करत अजित पवार कारखान्यांचे मालक झाले. ते महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहेत." यानंतर राष्ट्रवादीत संताप निर्माण झाला आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांचा निषेध केला.  

Category

🗞
News
Transcript
00:00I am going to say that the government is in the government.
00:30Thank you very much.
01:00Thank you very much.
Be the first to comment
Add your comment

Recommended