पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध घटना घडत आहेत. मंगळवारी रात्रीदेखील पुण्यातील कॅम्प परिसरात एका मद्यधुंद गाडीचालकाचा थरार पाहायला मिळाला. कॅम्प परिसरात गाडी चालवताना गाडीचा टायर निघाल्यानंतर देखील चालक भरधाव वेगानं गाडी चालवत होता आणि सामन्यांच्या जीवाशी खेळत होता. अशा स्थितीत धाडसी युवक सत्यजित सरवदे यांनी गाडीचा पाठलाग करत, कोरेगाव पार्क परिसरात गाडी थांबवली. या धाडसामुळे एक मोठा अपघात टळला. पुण्यातील कॅम्प परिसरात रात्रीच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. कल्याणी नगर पासून ते रेल्वे स्टेशन पर्यंत हा मद्याधुंद चालक ही गाडी चालवत होता. गाडी थांबवल्यानंतर वाहतूक पोलिसांना माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या नाकाबंदी सुरू असतानादेखील घटना घडली. सदर व्यक्तीवर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये डंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाच्या हातात पार्टीचा बँड बांधला होता आणि तो अत्यंत वेगाने कोरेगाव पार्क परिसरातून गाडी चालवत होता. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Be the first to comment