बीड : जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचाराची रणधुमाळी चालू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपला मतदार कसा सक्षम आहे, विकासाच्या योजना तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकतो अशा पद्धतीचे आश्वासन आता नागरिकांना दिलं जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. "राज्याचे उपमुख्यमंत्री खंबीर आहेत. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. कुठल्याही आश्वासनाला व थापांना बळी पडू नका. आम्ही दिलेला उमेदवार हा तुमच्या विकासासाठी अत्यंत सक्षम आहे," असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी सभेमधून व्यक्त केला. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपाचे कमळ हातात घेतलेल्या योगेश क्षीरसागर यांना आमदार विजयसिंह पंडित यांनी थेट इशारा दिला. नगरपरिषद निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या उमेदवारांना डावललं आणि एकही निवडणूक न लढवलेल्यांना उमेदवारी दिली. मी इथेच लहानाचा मोठा झालोय. माझ्यावर आरोप करणं सोडून द्या, असंही आमदार आमदार विजयसिंह पंडित म्हणाले.
Be the first to comment