जालना : मराठा समाजासाठी अजित पवारांचं अर्थ खातं ताकदीनं काम करतं. असं काम ते ओबीसीसाठी करत नाहीत, असा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. "उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या कार्यालयात लावणीचे कार्यक्रम होत असतील तर येणाऱ्या काळात यांच्या पक्षाचे बारा वाजवा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देखील यांच्या पक्षाचे बारा वाजवा. सारथी संस्थेला वेगळा आणि म्हाज्योतीला वेगळा न्याय का? सत्तेतील पक्षांना ओबीसींनी घराचा रस्ता दाखवावा. सत्ताधारी पक्षांकडून ओबीसी आरक्षणाची राजकीय हत्या करण्यात आली असून पाचवी नापास बिनडोकाच्या नादाला लागून महायुती सरकार चुकीचा निर्णय घेत असेल तर यांना त्यांची जागा दाखवून देऊ," असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना माध्यमांशी बोलताना दिला.
Be the first to comment