शिर्डी : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार आहोत. विधानसभा निवडणुकीतही आघाडी होती, असं सांगत नगरपालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेणार का? या प्रश्नावर जास्त बोलणं टाळत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस मनसेला सोबत घेण्यास इच्छुक नसल्याचेच संकेत दिले आहेत.आगामी शिर्डी नगरपालिका आणि राहाता नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची शिर्डीत गुरुवारी बैठक पार पडली. यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, "डबल स्टारचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी कशी होते? यावर आम्ही लक्ष ठेवून असणार आहोत. फक्त आश्वासनाने चालणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने आता पक्ष स्थापन कारायला हरकत नाही." "राहुल गांधी यांनी आरोप केल्यानंतर निवडणूक आयोग थातूरमातूर उत्तर देत आहे. निवडणूक आयोगाने खुलासा केला पाहिजे. राहुल गांधींसह जनतेचे समाधान निवडणूक आयोगाने केले पाहिजे. राजकीय नेत्यांसारखे उत्तर देत आहेत," असाही टोला यावेळी बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाला लगावला आहे.
Be the first to comment