Skip to playerSkip to main content
  • 5 months ago
बीड- राज्यभरात मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील विंचरणा नदीचा रामेश्वराच्या खोल दरीत कोसळणारा धबधबा गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने प्रवाहित झालाय. ऑगस्ट महिनापासून सुरू झालेल्या पावसामुळे धबधब्याचं रौद्ररूप पर्यटकांना पाहावयास मिळत आहे. मराठवाड्याचा अर्धेअधिक भाग सुजलाम सुफलाम करणाऱ्या मांजरा, सिंदफना, विंचरणा, बिंदुसरा, डोमरी या नद्यांचे उगमस्थान असलेल्या पाटोदा तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाळा संपत आला असताना पावसाने जोर धरला आहे. विंचरणा या नदीच्या उगम स्थानापासून राज्यात प्रसिद्ध धबधबा असलेल्या सौताडा येथील रामेश्वरपर्यंतच्या 20 किलोमीटरच्या अंतरात या नदीवर सौताडा येथील रामेश्वर साठवण तलाव, भुरेवाडी, लांबरवाडी, मुगगाव अशी तलावांची साखळी आहे. उगमस्थानापासून सौताडापर्यंत वरचे चार तलाव भरल्याशिवाय सौताडा येथील रामेश्वर साठवण तलाव भरत नाही आणि हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याशियाय येथील प्रसिद्ध धबधबा प्रवाहित होत नाही.
मराठवाड्याचा मिनी महाबळेश्वर म्हणून परिचित असलेला पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील प्रसिद्ध रामेश्वर धबधबा हा गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे धो धो वाहत आहे, यामुळे येथील अप्रतिम निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ घालीत असून हे सौंदर्य 'याचि देही याचि डोळा' पाहण्यासाठी येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. तालुक्यातील हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आणि निसर्गरम्य आहे. सौताडा येथील रामेश्वर धबधब्याला अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेलं आहे. हजारो फूट उंचीवरून धीरगंभीर आवाज करीत खोल दरीत धो धो कोसळणारा धबधबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00This video is made possible in the video description of the video description.
Be the first to comment
Add your comment

Recommended