Pune News | पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान धक्कादायक प्रकार! ॲम्बुलन्स अडकल्याने रुग्णाला थेट स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेले! 🚑🚨 . पुण्यातील पुणे हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळच गणेश मंडळाच्या रथ, गर्दीमुळे रुग्णवाहिकेला (Ambulance) जाण्यास जागा उरली नाही. रस्ता पूर्णपणे बंद झाल्यामुळे अखेर रुग्णवाहिका चौकातच थांबवावी लागली आणि रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवून रस्त्यावरून रुग्णालयात घेऊन जावे लागले. सुदैवाने संबंधित रुग्ण ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर नव्हता, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला; पण जर गंभीर रुग्ण असता तर? असा अत्यंत गंभीर प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. उत्सव साजरा करताना आपत्कालीन सेवांसाठी रस्ता मोकळा ठेवणे ही प्रशासनासोबतच नागरिकांचीही जबाबदारी नाही का? . यावर तुमचे काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा! 👇 . #PuneNews #PuneAmbulance #SatyaprabhaNews #GaneshVisarjan #EmergencyServices #PuneHospital