Pune | पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत माणुसकीचे दर्शन! टिळक चौकात ॲम्बुलन्ससाठी क्षणात रस्ता मोकळा! 🚑✨💙| Satyaprabha News
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुण्यातील अलका टॉकीज / टिळक चौकात हजारो भाविकांची गर्दी आणि ढोल-ताशांचा गजर सुरू असतानाच एक रुग्णवाहिका (Ambulance) तिथे आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गणेशभक्त, कार्यकर्ते आणि पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत क्षणात गर्दी बाजूला करून ॲम्बुलन्सला सुखरूप जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली.
उत्सवाचा आनंद आणि उत्साह एका बाजूला असताना रुग्णाचा जीव वाचवण्याला प्रथम प्राधान्य देत पुणेकरांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे.
पुणेकरांच्या या तत्परतेवर आणि माणुसकीवर तुमचे काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
.
#PuneGaneshVisarjan #TilakChowk #SatyaprabhaNews #HumanityFirst #AmbulanceWay #PuneNews