पुणे : राज्य शासनानं मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालाय. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद सुरू असताना आता वंजारी समाज देखील आक्रमक झाला आहे. हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला एसटीमधून आरक्षण द्यावं ही मागणी केली जात आहे. वंजारी समाजाचे नेते बाळासाहेब सानप यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. वंजारी समाजालादेखील आता एसटीमधून आरक्षण द्यावं, अशी मागणी केली. "आम्हीदेखील राज्यभर समाजाची बैठक घेत आरक्षणासाठी तीव्र असा लढा उभा करू. राज्य सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नुकतच हैदराबाद गॅझेट लागू केलंय. हैदराबाद गॅझेटमध्ये वंजारी समाजाला एसटीमधून आरक्षण दिलं आहे. आता आम्हालादेखील एसटीमधून आरक्षण देण्यात यावं. आम्हाला जे आरक्षण मिळालं आहे, त्यातून आमच्या मुलांना कोणताही लाभ होत नाही," असा दावा वंजारी समाजाचे नेते बाळासाहेब सानप यांनी केला.
Be the first to comment