सातारा : महाबळेश्वरमध्ये आयोजित केलेल्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्सच्या 'MAPCON २०२५' या संमेलनात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विरोधकांवर निशाणा साधला. "मी पेशानं डॉक्टर नाही, पण छोटी-मोठी राजकीय ऑपरेशन अगदी सहज करून टाकतो. महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं मोठं ऑपरेशन मी काही वर्षांपूर्वी यशस्वी केलं केलं. तुम्ही (डॉक्टर) हृदय बरे करता आणि आम्ही कधी कधी लोकांच्या हृदयाचे ठोके चुकवतो. महाबळेश्वरात प्रदूषण नाही. त्यामुळं पूर्वी रुग्णांना बरं वाटावं म्हणून हवा पालटासाठी महाबळेश्वरला पाठवलं जायचं. इथं आलं की रूग्णांचा स्ट्रेस हलका होतो. परंतु, मी इथं गावाला आलो की आमच्या विरोधकांचा स्ट्रेस वाढतो," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विरोधकांवर निशाणा साधला.
Be the first to comment