पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असून सर्वच पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडून असून भाजपाला रोखण्यासाठी भाजपावर जोरदार टीका करत आहेत. त्यातच आज अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध मतदार संघात रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या रोड शोला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं. ठिकठिकाणी स्वागत तसंच कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यातील गोखलेनगर येथील कुसाळकर पुतळ्यापासून सुरू झालेल्या या रोड शोला चांगला प्रतिसाद मिळत शहरातील विविध मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं रोड शो झाला. पुण्यात अजित पवार यांच्या रोड शोला मोठा प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला.
Be the first to comment