रायगड : रेल्वेची सेवा भारतातील प्रत्येक भागात पोहचवावी यासाठी भारतीय रेल्वे सातत्यानं प्रयत्न करत आहे. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत रेल्वे सेवा पोहचत आहे. त्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी बीड ते अहिल्यानगर अशी रेल्वे सेवा सुरू झाली होती. त्यातच आता महाडला रेल्वे देण्याची मागणी केली जात आहे.महाडला रेल्वे सुविधा मिळावी या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे महाड शहराध्यक्ष पराग वडके यांनी उपोषण छेडलं होतं. या आंदोलनानंतर आता खासदार सुरेश म्हात्रे यांनी महाडला भेट देत स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. रेल्वे प्रकल्पाबाबत नागरिकांच्या अपेक्षा आणि मागण्या जाणून घेत खासदारांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. या संदर्भात खासदार सुरेश म्हात्रे यांच्याशी आमचे प्रतिनिधी सिद्धांत कारेकर यांनी खास बातचीत केली आहे.
Be the first to comment