Skip to playerSkip to main content
  • 7 months ago
रायगड : रायगड जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसामुळं अनेक नदी, नाले आणि धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळं पर्यटक आता अनेक पर्यटनस्थळांवर जाण्यास सज्ज झाले आहेत. मात्र,  पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनानं अनेक ठिकाणं पर्यटकांसाठी बंद केली आहेत. पावसाळी पर्यटन स्थळ आणि धबधब्यांवर पर्यटकांचा होणारा अतिउत्साह आणि वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन प्रशासनानं पावसाळी पर्यटनावर निर्बंध घातले आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगडमध्ये प्रसिद्ध आणि धोकादायक धबधबे, नद्यांवर जाणाऱ्या रस्त्यावर रविवार सकाळपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. बंदोबस्तासाठी असलेले पोलीस या पर्यटकांना पुढे जाण्यास अटकाव करत आहेत. यानंतरही पर्यटक धोकादायक ठिकाणी पर्यटन करताना दिसले तर कारवाई होणार आहे, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलाय.

Category

🗞
News
Comments

Recommended