Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4 months ago
हैद्राबाद : पद्मविभूषण पुरस्कार विजेते 'रामोजी राव' यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त रामोजी फिल्म सिटीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात लोकांनी त्यांचं स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक दिवंगत रामोजी राव यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान केलं. रेड क्रॉस सोसायटीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराचं उद्घाटन रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे सीएमडी चेरुकुरी किरण आणि रामोजी फिल्म सिटीच्या एमडी चेरुकुरी विजयेश्वरी यांनी केलं. त्यांनी रक्तदान केंद्रात सेवा देणाऱ्या रेड क्रॉस सोसायटीच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. 'ईटीव्ही भारत'ची केली स्थापना : रामोजी फिल्म सिटी (RFC) चे संस्थापक चेरुकुरी रामोजी राव यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापारुपुडी गावात झाला. इतकेच नाही तर जगातील सर्वात मोठ्या वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या ईनाडूचे संस्थापक रामोजी राव यांनी १९९६ मध्ये जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी बांधली. त्याचवेळी, अनेक भाषांमध्ये लोकांपर्यंत बातम्या पोहोचवण्यासाठी रामोजी राव यांनी 'ईटीव्ही भारत' चॅनेलची स्थापना केली. आज श्रद्धांजली सभेत त्यांची आणि त्यांच्या कामाच्या आठवणीने लोकांच्या डोळ्यात पाणी आले.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended