पंढरपूर (kartiki Ekadashi 2025) : पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशी सोहळ्याला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आणि मानाच्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्यभरातून या सोहळ्यासाठी जवळपास पाच ते सहा लाख भाविक दाखल झाले आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त वाळवंटाचा परिसर, नामदेव पायरी परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. तर मंदिर प्रशासनाच्या वतीनं गाभार्यामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून, पदस्पर्श दर्शनासाठी गोपाळपूर येथील पत्रा शेडपर्यंत रांग गेली आहे. भाविकांना दर्शनासाठी तब्बल पाच ते सहा तास लागत असून दर्शन रांगेमध्ये प्रशासना आणि मंदिर प्रशासनाच्या वतीनं विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
Be the first to comment