शिर्डी : 'नेत्रसेवा हीच साई सेवा' या साईप्रेरित ब्रीदवाक्याला साजेसा उपक्रम शिर्डीत पार पडला. शिर्डीतील साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरावे मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर शिर्डीत आयोजित करण्यात आले होते. गोरगरीब, गरजू रुग्णांना डोळ्यांच्या उपचारासाठी मोफत सुविधा पुरविणे व त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट व आर झुनझुनवाला ट्रस्ट यांच्या माध्यमातून केला जातोय.29 जुन रोजी आयोजित करण्यात आलेल्या 15 व्या शिबीरासाठी राज्यभरातून गरजू शिर्डीत दाखल झाले होते. आजपर्यंत तब्बल 10 हजार हून अधिक रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली आहे. तसेच अडीच हजारहून अधिक रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याशिवाय हजारो गरजू नागरिकांना मोफत चष्मेही वाटण्यात आले असल्याची माहिती साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या विश्वस्त संगीता गायकवाड यांनी दिली आहे.
Be the first to comment