Skip to playerSkip to main content
  • 17 hours ago
हैदराबाद: हैदराबाद येथील जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीमध्ये सोमवारी ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. रामोजी फिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) सी. विजयेश्वरी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी राष्ट्रध्वज फडकवला. रामोजी फिल्म सिटीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली. रामोजी फिल्म सिटीच्या  एमडी सी. विजयेश्वरी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. एकता आणि समर्पणाचं यावेळी महत्त्व अधोरेखित केले. रामोजी फिल्म सिटी, ईनाडु, ईटीव्ही, ईटीव्ही भारत आणि डॉल्फिन हॉटेल्सच्या विविध विभागांचे प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी या संस्मरणीय सोहळ्यात सक्रियपणे भाग घेतला.  प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम देशभक्तीपूर्व वातावरणात साजरा झाला. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही तेलुगू राज्यांमधील सर्व जिल्हा आणि शहरांमध्ये राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा भव्यतेनं साजरा करण्यात आला.

Category

🗞
News
Transcript
00:00Thank you very much.
00:30Thank you very much.
Comments

Recommended