पुणे : 6 जानेवारी 1832 रोजी आपल्या विसाव्या वाढदिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण‘ हे पहिले मराठी वृत्तपत्र काढले. यानिमित्त राज्यात 6 जानेवारी हा दिवस 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो. आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने 'ई टीव्ही भारत'चे पुण्याचे बातमीदार सज्जाद सय्यद (Sajjad Sayyed) यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार (Balshastri Jambhekar Award 2025) प्रसिद्ध अभिनेते किरण माने आणि संपादिका सरिता कौशिक यांच्याहस्ते राज्यभरातील विविध पत्रकारांना देण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे गेल्या तीन वर्षापासून राज्यभरातून विविध पत्रकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. परिसंवादाचे आयोजन : आज निगडी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते किरण माने आणि विविध वृत्तवाहिनी तसंच वृत्तपत्रांच्या संपादकांच्या उपस्थितीत 'महाराष्ट्रातील माध्यमांची दशा आणि दिशा' यावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात पत्रकारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
Be the first to comment