रायगड : अलिबागचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांच्या कथित व्हिडिओला व्हायरल केल्यानंतर रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आज अलिबागमध्ये आंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं. जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी हा निषेध नोंदवला. दानवे यांनी व्हिडिओद्वारे आमदार दळवी यांच्यावर खोटा आरोप करून राजकीय प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जिल्हाप्रमुखांनी केला आहे. तर हा व्हिडिओ AI च्या माध्यमातून बनवलेला असून पूर्णपणे खोटा असल्याचा दावा स्वतः आमदार दळवी आणि पक्षाकडून करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख राजा केणी म्हणाले की, “हिवाळी अधिवेशनात गौप्यस्फोट करण्याचे नाटक करण्यासाठी आणि स्वतःची राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी दानवे यांनी हा खोटा व्हिडिओ तयार केला. दळवी यांना अडकवण्याचा हा डाव असून यामागील बोलविता धनी कोण आहे, हे आम्ही शोधणार आहोत.”
Be the first to comment