मुंबई : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (15 जानेवारी) मतदान होत आहे. सकाळी 7.30 वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. खरं तर, मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण 227 वॉर्ड आहेत. तर एकूण 1,700 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, महापालिकेची निवडणूक ही थेट स्थानिक जनतेशी जोडलेली आहे. त्यामुळं अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दरम्यान, मुंबईत सकाळपासूनच अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा अधिकार बजावला. ज्यात हिंदी चित्रपटसृष्टीसह मराठी कलाकारांचाही पुढाकार होता. वांद्रे कलानगर परिसरात राहणारी मराठी अभिनेत्री मनवा नाईक हिनं सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी, "मुंबईकरांना बदल हा योग्य अर्थानं मिळायला हवा. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ही निवडणूक होतेय. त्यामुळं आपल्या आसपास काय चाललंय? याचा विचार करून प्रत्येकानं मतदान करायला हवं," असं मत मनवा नाईक हिनं "ईटीव्ही भारत"शी बोलताना स्पष्ट केलं.
Be the first to comment