बीड : कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी भाव वाढीसाठी आक्रमक झाला आहे. जनआंदोलन लढ्यासंदर्भात बीड शहरात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सोयाबीनला 7 हजार आणि कापसाला 12 हजार रुपये भाव द्या अशी मागणी करण्यात आली. तसंच शासकीय खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांची लूट थांबवणं, हमीभावापेक्षा कमी भावानं खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणं अशा मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली. आगामी काळात सरकारनं ठोस उपाय योजना न केल्यास राज्यभर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत अन्यथा लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. या बैठकीला विविध गावातील अनेक शेतकऱ्यांनी आणि विविध शेतकरी विविध संघटना, पक्ष, गावातील तरुण शेतकरी, महिला शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
Be the first to comment