पुणे: राज्यातील मराठवाड्यातील काही भागात पावसाने (Heavy Rain) पुन्हा कहर केलाय. मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. असं असताना येत्या 26 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होणार आहे आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर एस. डी. सानप यांनी दिलाय. यंदा 1 जून ते आतापर्यंत मराठवाड्यात सरासरीपेक्षा 27 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तसेच मराठवाड्यात आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. यानंतर 26 तारखेनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढणार आहे. याचे कारण म्हणजे पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. तो जेव्हा पश्चिमेकडे सरकत जाईल, तेव्हा त्याचा परिणाम राज्यातील काही भागात झालेला पाहायला मिळाला.
Be the first to comment