शिर्डी : आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी शनिवारी कुटुंबातील इतर सदस्यांसह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राघव चढ्ढा यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी साईबाबांच्या दुपारच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावली. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना राघव चढ्ढा म्हणाले की, "साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मनाला शांती मिळते. आज माझ्याकडे जे काही आहे ते सगळे साईबाबांनी दिले आहे. त्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याची इच्छा होती."शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. ज्यावेळी कामातून थोडा वेळ मिळतो, त्यावेळी लगेच शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतो. आज साईबाबांचे बोलावणे आल्याने आई आणि कुटुंबातील सदस्यांना घेऊन साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असल्याचं राघव चढ्ढा यांनी सांगितले.साईबाबांच्या आशीर्वादाने आम्हाला मुलगा झाला. पत्नी परिणीतीलाही साईच्या दर्शनाला यायचे आहे. मात्र, थोडे दिवस डॉक्टरांनी आराम करायला सांगितल्याने आज ती येऊ शकलो नाही. पुढच्यावेळी नक्की परिणीती आणि मुलाला घेऊन साईबाबांच्या दर्शनासाठी येणार असे राघव म्हणाले.
Be the first to comment