पुणे : नुकतंच पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या वतीने राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर राबवित पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्यात आला होता. हीच बाब लक्षात घेत पुण्यातील कलाविष्कार आर्ट अकादमी आणि वानवडी अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त तब्बल 1500 फूट वर्तुळाकार भारत मातेचा झेंडा आणि कुंकवाचा वापर करून 4500 अष्टलक्ष्मी पाऊल पूजन करण्यात आलं आहे. या उपक्रमात मूकबधिर, अनाथ मुलांच्या सहभागातून 1500 फूट वर्तुळाकार भारत मातेचा झेंडा कलारूपात साकारण्यात आला. तसेच आदिशक्तीच्या ऊर्जास्रोताने कुंकवाचा वापर करून 4500 अष्टलक्ष्मी पाऊल पूजनही करण्यात आलंय. 'ऑपरेशन सिंदूर' या संकल्पनेतून भ्रष्टाचार, दहशतवाद आणि वासनारूपी राक्षसासारख्या वाईट प्रवृत्तींचा संहार करण्याचा संदेश यातून देण्यात आला आहे. कलाविष्कार आर्ट अकादमीकडून साकारण्यात आलाय.
Be the first to comment