Skip to playerSkip to main content
  • 1 day ago
रायगड - देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांचे कार्य देशवासीयांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी महाड येथे केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता रॅलीचे महाडमध्ये आगमन झाले. यावेळी पालकमंत्री गोगावले यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

 सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय, अलिबाग यांच्या वतीने राष्ट्रीय एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे महाड शहरात आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

दक्षिण भारतातून सुरू झालेली ही राष्ट्रीय एकता रॅली सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पोहोचणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, तसेच अमली पदार्थांविरोधातील लढ्याबाबत जनजागृती करणे हा या रॅलीचा प्रमुख उद्देश आहे. या रॅलीमध्ये गोवा, केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटक येथील पोलीस दलातील रायडर्स सहभागी झाले आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून देशाची एकता, अखंडता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात येत असून, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे स्मरणही केले जात आहे. रॅलीच्या स्वागतासाठी महाडमध्ये पोलीस प्रशासनासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, प्रांताधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप काळे, महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यासह पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Category

🗞
News
Transcript
00:00foreign
00:04foreign
00:36Thank you very much.
00:36Thank you very much for joining us today.

Recommended