पुणे : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांत भाजपानं अभूतपूर्व यश मिळवत राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत देखील पुणेकरांनी भाजपाला साथ दिली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपानं एकहाती सत्ता आणली असून तब्बल 119 नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहे. तर दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आक्रमक प्रचार केलेला असताना देखील अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. मात्र, असं असताना पुणे शहराचेच नव्हे तर राज्याचं लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक 9 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल बालवडकर विजयी झाले आहेत. अमोल बालवडकर यांनी विजयी झाल्यावर भाजपावर जोरदार टीका करत डुब्लिकेट पैलवानांनी कुस्तीची भाषा शिकवू नये. पुणेकरांनी तुमच्याकडे बघून नव्हे तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या कामाकडे बघून मतदान केलं आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
Be the first to comment