मुंबई- राज्यात महापालिकांच्या निकालांचे कल हाती यायला सुरुवात झाली असून, मुंबईत भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता येणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. परंतु मुंबईतील मराठीबहुल भाग असलेल्या लालबाग, परळ, दादर, माहीम सारख्या परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेनं आपला दबदबा कायम ठेवल्याचं चित्र एकंदरीत हाती आलेल्या कलांमधून समोर येत आहे. दादरमधील शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा वॉर्ड नंबर 182 इथून शिवसेना उबाठा पक्षाचे मिलिंद वैद्य विजयी झालेत. विजयी झाल्यानंतर वैद्य यांनी ई टीव्ही भारतशी बातचीत केलीय. शेवटच्या सभेमध्ये जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असे आवाहन केले होते, त्यावर आम्ही खरे उतरलो, याचे समाधान आहे. विशेष म्हणजे यावेळी आम्हाला धोका देऊन जे निघून गेले, सोडून त्यांनासुद्धा ही एक चपराक आहे. कारण मी यावेळी सर्वाधिक मताधिक्क्यांनी निवडून आलो असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
Be the first to comment