Skip to playerSkip to main content
  • 5 months ago
बीड- राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा विषय विधानसभा निवडणुकीवेळीच संपला होता. त्यांनी ज्यांच्या विरोधात माजलगाव मतदारसंघात निवडणूक लढवली आणि आम्ही माजलगावमध्ये ज्यांना निवडून आणले, त्यांच्याकडे हे दोघे आता गेले आहेत. त्यामुळे हा विषय आता नवा नाही, परंतु पंकजा मुंडेंचं नाव घेतल्यास बातम्या होतात, या विषयात पंकजा मुंडेंना धक्का वगैरे असं काही नाही, अशी भूमिका राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडलीय. वैद्यनाथ बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांच्यासह मुंडे परिवाराने परळी येथे मतदान केलंय, यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत आमचे चार उमेदवार बिनविरोध विजयी झालेत, उर्वरित उमेदवारांच्या विजयासाठी आम्ही मतदारांपर्यंत पोहोचलो होतो. लोकशाही पद्धतीने ही निवडणूक होत आहे, त्यावर आमचा विश्वास आहे, असंदेखील पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended