नागपूर : 'टायगर कॅपिटल' ओळख असलेल्या नागपुरात बिबट्यांनी (Nagpur Leopard) अक्षरशः धुमाकूळ घातलाय. गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा बिबट्या नागरी वस्तीत शिरल्यामुळं शहरात दहशत निर्माण झाली आहे. 10 डिसेंबरला सकाळी पूर्व नागपूरच्या पारडी परिसरातील शिवनगर वस्तीत बिबट्यानं धुमाकूळ घालत तब्बल 7 नागरिकांवर हल्ला केला होता. यात एक नागरिक गंभीर जखमी झाला होता. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबटला शेड्युल 1 मधून काढून शेड्युल 2 मध्ये टाकण्याची मागणी केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाकडं केली आहे. तर यावर आशिष देशमुख म्हणाले, "माझी केंद्रीय वनमंत्र्यांना विनंती राहील की समस्या हातापलीकडं गेली आहे, त्यामुळं बिबट मारण्यासंदर्भात त्यांनी परवानगी द्यावी आणि याचा निर्णय केंद्रीय वनमंत्र्यांनी लवकर घ्यावा."
Be the first to comment