Skip to playerSkip to main content
  • 2 months ago
पुणे : अंगारकी चतुर्थी निमित्त (Angarki Chaturthi) आज रांजणगाव श्री महागणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. पहाटे ५ वाजता श्री महागणपतींचा महाभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. तर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आलं. यामध्ये श्री मंगलमूर्ती विद्याधाम, रांजणगाव गणपती शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच अनेक भाविकांनी सहभाग घेतला होता. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टतर्फे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंदिर गाभारा आणि परिसराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याप्रसंगी मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, चेअरमन दत्ताशेठ पाचुंदकर पाटील, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे, देवस्थान कर्मचारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended