कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करताच राज्यभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात आयोजित गटप्रमुख मेळाव्यात कार्यकर्त्यांसह उत्साही भाषण केलं आहे. “सुपारी फुटली आहे, आता लगीनघाई सुरू झाली आहे,” म्हणत त्यांनी शिवसैनिकांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापुरातील शिवसेना गटप्रमुखांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या वोट चोरीवर बोलताना त्यांनी गेले कित्येक वर्षे नोट चोरी केली असल्याचा हल्लाबोल केला आहे.कोल्हापुरातील कार्यकर्त्यांना आणि गटप्रमुखांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रोत्साहित करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आलेल्या या मेळाव्यामध्ये, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री योगेश कदम, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार जयश्री जाधव, माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्यासह शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be the first to comment