पुणे: विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणी दुसऱ्या दिवशीदेखील सुरू आहे. शिक्षक मतदार संघात भाजपाचे कौस्तुभ गावडे हे आघाडीवर आहेत. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणी सुरू आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे बुधवारीपासून पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी शिक्षकांच्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पक्षाकडून पैशांचा पाऊस पडला गेल्याचा आरोप केला आहे. संस्थाकडून शिक्षकांवर दबाव आणण्यात आला आहे. जो काही निकाल लागला आहे, तो मला मान्य आहे, असे यावेळी त्यांनी सांगितलं. यावेळी दत्तात्रय सावंत म्हणाले की, खूपच बेक्कार अशी स्थिती आहे. मतदानाच्या दिवशीदेखील बूथवर पैसे वाटण्यात आले आहेत. प्रशासनानं जी भूमिका घ्यायला पाहिजे होती, ती त्यांनी घेतली नाही.
Comments