बीड : नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. शिवसंग्रामची महत्त्वाची भूमिका गेल्या अनेक निवडणुकांमध्ये पाहिली आहे. महायुतीकडे शिवसंग्रामने 12 जागांची मागणी केली होती. मात्र, चार जागा शिवसंग्रामला मिळाल्या आहेत. त्यावर देखील शिवसंग्राम समाधानी आहे. या निवडणुकीमध्ये विकास हाच केंद्रबिंदू मानून जागा लढवल्या जाव्यात हा आमचा हेतू आहे. त्या गोष्टीवर जे सहमत होतील त्यांना आम्ही मदत करायचे ठरवले आहे. बीड नगर परिषदेच्या कामकाजाबाबत 2014 पासून सातत्याने आवाज उठवला जात आहे. राज्याच्या विधिमंडळात हे प्रश्न मांडून भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. थोडक्यात बीड शहर विकासापासून कोसो दूर आहे, अशी भूमिका मांडत ज्योती मेटे यांनी स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका केली. त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोप जोरदार होण्याची शक्यता आहे.
Be the first to comment