Skip to playerSkip to main content
  • 6 hours ago
शिर्डी (अहिल्यानगर)- साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या चरणी नवी दिल्ली येथील साईभक्त डॉ. प्रणव मिश्रा यांनी सुवर्ण अलंकार अर्पण केला. 24 ग्रॅम वजनाचा आणि सूर्याच्या आकर्षक आकारातील देखणा सोन्याचा ब्रोच त्यांनी साईबाबांच्या चरणी अर्पण केला. या सुवर्ण ब्रोचची किंमत 2 लाख 88 हजार 408 रुपये इतकी आहे. श्रद्धा व्यक्त करताना डॉ. मिश्रा यांनी गेल्या 20 वर्षांपासून आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष माध्यमातून साईबाबांशी जोडले गेलो असल्याचे सांगितले. साईबाबांप्रति असलेली श्रद्धा आणि भक्तिभाव यामुळे आपण सातत्याने त्यांच्या चरणी नतमस्तक होत असतो. जेव्हा-जेव्हा साईबाबांची हाक येते आणि शिर्डीत येण्याची संधी मिळते, तेव्हा  आपण साईबाबांच्या दरबारात हजेरी लावतो असेही डॉ. मिश्रा यांनी सांगितलं आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00I am Dr Prado Mishra, I am a Delhi Karanilasian, and I am a
00:40Thank you very much.

Recommended