Skip to playerSkip to main content
  • 2 days ago
अहिल्यानगर : श्री क्षेत्र बुऱ्हाणनगर येथील श्री भवानी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त दुर्गाष्टमी होम पारंपरिक पद्धतीने भक्तिभावात पार पडला. यानिमित्त शुंभ-निशुंभ आणि महिषासुर यांच्या प्रतिकृती तयार करून त्यांच्या वधाचा प्रतीकात्मक देखावा साकारण्यात आला. श्री देवीची पौराणिक प्रसंगाला अनुसरून विशेष सजावट करण्यात आली होती.

 दुर्गाष्टमीनिमित्त विधिवत होम-हवन करून दुष्काळाचे संकट दूर व्हावे, समाधानकारक पर्जन्यवृष्टी व्हावी, शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा, तसेच रोगराई आणि नैसर्गिक संकटांचे निवारण व्हावे, यासाठी संकल्प करण्यात आला. जनकल्याणाच्या भावनेतून होमामध्ये आहुती अर्पण करण्यात आल्या. शुंभ-निशुंभ आणि महिषासुर वधाचा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.

 झोपडी प्रज्वलनाची परंपरा कायम - दुर्गाष्टमी होमाच्या निमित्ताने झोपडीची प्रतिकृती तयार करून तिचे पारंपरिक पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या प्रथेचा संबंध बुऱ्हाणनगरहून तुळजापूर येथे जाणाऱ्या पायी पालखी यात्रेशी असल्याचे भगत परिवाराच्या मौखिक परंपरेत सांगितले जाते.

 पूर्वी भगत परिवारातील पूर्वज श्री देवीची पालखी घेऊन बुऱ्हाणनगरहून तुळजापूरला पायी जात असत. या प्रदीर्घ यात्रेदरम्यान घराची ओढ आणि आठवण मागे ठेवून देवीच्या सेवेत पूर्ण लक्ष केंद्रित करण्याच्या भावनेतून घराचे प्रतीक असलेली झोपडी प्रज्वलित करण्याची प्रथा सुरू झाल्याचे सांगितले जाते. पुढील पिढ्यांनीही ही परंपरा जपली असून आजही दुर्गाष्टमीला तिचे पालन केले जाते.

 श्री बुऱ्हाणनगर भवानी मंदिराचे प्रमुख तथा पुजारी अॅड. विजय भगत यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी पार पडले. अॅड. अभिषेक भगत आणि सौ. कविता भगत यांनी संकल्प सोडून पूर्णाहुती दिली.

 यावेळी सौ. दुर्गा भगत, सुभाष भगत, सुनंदा भगत, कुणाल भगत, अॅड. संकेत भगत, अक्षदा भगत, अजिंक्य भगत, वैभवी भगत, वेद, वेदिका यांच्यासह भगत परिवारातील सदस्य आणि देवीभक्त उपस्थित होते.

: घराच्या मोहाचा प्रतीकात्मक त्याग -  तुळजापूरच्या पायी पालखी यात्रेदरम्यान घराची आठवण मागे ठेवून देवीच्या सेवेत समर्पित होण्याच्या भावनेतून झोपडी प्रज्वलनाची परंपरा सुरू झाल्याचे भगत परिवाराच्या मौखिक परंपरेत सांगितले जाते. हा विधी आजही सांस्कृतिक वारसा म्हणून जपला जात आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00Thank you very much.
00:58Thank you very much.
01:22Thank you very much.
01:42Thank you very much.
02:08Thank you very much.
03:05Thank you very much.

Recommended