पुणे : महापालिका निवडणुकीसाठी आज 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होत असून सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दुपारी बारापर्यंत 12.50 टक्के मतदान झालं होतं. अनेक लोकप्रतिनिधी तसंच कलाकार यांच्याकडून देखील मतदान होत आहे. आज ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी देखील मतदान करत, मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी अभिनेता मोहन आगाशे म्हणाले, "मी भावना शून्य झालो आहे लोकशाही, जेव्हा सुरू झाली तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती ही वेगळी आहे. तसंच तेव्हाच्या आणि आत्ताच्या राजकारणात देखील खूप फरक पडला आहे.आत्ता नक्की कोण कुठं आहे हेच कळत नाही. मतदारांनी डोळे कान उघडा आणि तोंड बंद करा तसंच जे दिसत आहे त्याबाबत आतून जे वाटतं तेच करा." यावेळी अनेक लोक देखील मतदान करण्यासाठी येत होते.
Be the first to comment