पुणे : जैन बोर्डिंगच्या व्यवहाराची चर्चा सर्वत्र होत आहे. जैन बोर्डिंगचे विश्वस्त जयंत नांदुरकर बोर्डिंगमध्ये आले होते. त्यावेळी आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी त्यांना खडेबोल सुनावत खरेदी व्यवहार रद्द करायला सांगितलं. जैन बोर्डिंगची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी बोर्डिंगच्या विश्वस्तांना जैन बांधवानी घेराव घातला. "जैन बोर्डिंगची जागा विक्री प्रकरणात सहभागी असलेले शासक, प्रशासक तसंच या कारस्थानात सहभागी असलेल्या सर्वांचा विनाश होईल. ट्रस्टच्या कागदपत्रातून मंदिर गायब केले. असा कोणता विकास साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात? की तुम्हाला धर्माचा नाश करायचा आहे. तुम्ही मंदिर विकलं. हे ट्रस्टचे कर्तव्य आहेत का? ज्या व्यक्तीनं जागा दिली ती विकण्याचा अधिकार आपल्याला आहे का? ज्या व्यक्तीनं जागा धर्मकार्यासाठी तसंच विद्यार्थ्यांसाठी दिली आहे, त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की ही जागा विकता येणार नाही," असं आचार्य श्री गुप्ती नंदीजी म्हणाले.
Be the first to comment