नांदेड : जिल्ह्यात निम्म मानार प्रकल्पात राज्यस्तरीय 'ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धे'चा थरार नांदेडकरांना अनुभवता आला. महाराष्ट्रीयन ड्रॅगन बोट अँड ट्रॅडिशनल वॉटर स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. नांदेडच्या कंधार तालुक्यातील ननिम्म मानार प्रकल्पात या ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील 15 पेक्षा अधिक जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते. राज्यात या खेळाचा अधिक प्रसार व्हावा आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती, प्रशिक्षक दिनेश मुंडे यांनी दिली. महाराष्ट्रीयन ड्रॅगन बोट अँड ट्रेडिशनल वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन आणि नांदेड जिल्हा ड्रॅगन बोट अँड ट्रेडिशनल वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय राज्यस्तरीय ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. राज्यात या खेळाचा अधिक प्रसार आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे अशी भावना खेळाडूंनी व्यक्त केल्या.
Be the first to comment