स्वीत्झर्लंडच्या दावोस इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचे शिष्टमंडळ जागतिक आर्थिक परिषदेला गेले होते. दावोस दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रासाठी लाखो कोटींची गुंतवणूक आणल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. ज्या कंपन्यांसोबत करार झाला त्या अमेरिका, इंग्लंड या देशातल्या आहेत, असं सांगितलं गेलं. मात्र प्रत्यक्षात या कंपन्या महाराष्ट्रातल्याच असल्याचा खुलासा झाला असून विरोधी पक्षांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तर यावर राज्य सरकारने देखील स्पष्टीकरण दिले आहे.
Be the first to comment