नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर झालेल्या सत्ताबदलानंतर हे पहिलेच हिवाळी अधिवेशन होते. शेवटच्या दिवशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाने केलेल्या प्रत्येक आरोपाचा समाचार घेतला. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्णपणे राजकीय होतं, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली. यावेळी महापुरुषांच्या अवमानाविरोधातही अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
Be the first to comment