या सरकारला ढाल-तलवारच्या ऐवजी कुलुप ही निशाणी द्यायला हवी होती Sanjay Raut Eknath Shinde

  • 2 years ago
"शिंदे गटांचं चिन्ह कुलूप असायला हवे, महाराष्ट्राच्या प्रश्नावर तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. त्यांच्या च्याव्या दिल्लीत आहेत. त्यांनी चावी दिली की ते बोलतात' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये सीमावाद कमालीचा पेटला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला इशारा दिला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.कर्नाटक मुद्द्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करत आहे. अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री यांनी कर्नाटक विषयांवर तोंड उघडले नाही. महाराष्ट्राचे शिंदे गटाचे पळकुटे खासदारांनी कर्नाटकच्या मुद्यावर संसदेत तोंड ही उघडले नाही. शिवसेनेचे खासदार आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी जोरदार बाजू लावली पण भाजप आणि शिंदे गटाच्या एकाही खासदाराने तोंड उघडलं नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

#SanjayRaut #Eknathshinde #Shivsena #Maharashtrapolitics #marathinews #Breakingnews #Maharashtranews #mahapolitics #hwnewsmarathi

Recommended