समन्सनंतर Sanjay Raut आक्रमक, कानडी संघटनांना राज्यातून छुपा पाठिंबा | Shivsena | Belgaum Border

  • 2 years ago
संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयानं समन्स बजावला आहे. 2018 मध्ये त्यांनी बेळगावात सीमावादावरून प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. यावरून आता त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना एक डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या समन्सनंतर संजय राऊत आक्रमक झाले आहेत. त्यांनी सीमा प्रश्नावरून पुन्हा एकदा शिंदे, भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सीमावादावर काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. कन्नड रक्षण वेदिकेवर कधी कारवाई होणार?सीमा प्रश्नासाठी आता मुख्यमंत्री पुन्हा आसामला जाऊन नवस बोलणार आहेत का? असा खोचक टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

#SanjayRaut #Karnataka #Maharashtra #Belgaum #Belgavi #BorderDispute #BasavarajBommai #EknathShinde #ShivSena #BJP #HWNews

Recommended